facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / सत्र संपले, आता मिळणार बूट

सत्र संपले, आता मिळणार बूट

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – शाळांचे अर्धे सत्र संपल्यानंतर मनपाच्या शाळेत बूट पोहोचले आहे. मोठ्यांना म्हणजे सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लिबर्टीचे, तर लहान्यांना, म्हणजे नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाटाचे शूज दिले जाणार आहे. गणवेशाचेही काहीसे असेच झाले होते. दोन जोड द्यायचे असताना काही शाळांत एकच जोड देण्यात आला होता.

प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका शाळेत ​शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांना जुनाच गणवेश शाळेत घालून यावा लागला. आता शाळेचे अर्धे सत्र संपल्यानंतर बूट दिले जाणार आहेत. शाळेचे सत्र सुरू होण्यापूर्वी महापालिकेने सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शालेय साहित्य देण्यात येईल, असा दावा केला होता. मात्र, महिना लोटल्यानंतरही इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ७ हजार २९२ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नव्हता. सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती-जमाती व दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. यंदा मनपाने मात्र वर्ग नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला.

मनपा शाळांच्या यंदाच्या २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीत २१ हजार ८३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान मोफत गणवेश योजनेंतर्गत यातील केवळ १३ हजार ६९० विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले होते. उर्वरित ८ हजार १४५ ओबीसी व खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेंतर्गत गणवेशाचा लाभ मिळणार नव्हता. या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा दोन जोड गणवेश मनपाने देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या शाळेतील नर्सरी, केजी वन आणि केजी- टू मध्ये शिकणाऱ्या १ हजार ३२० विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश खरेदी न करता, शाळा सुरू झाल्यानंतर करण्यात आली. त्यामुळे प्रारंभी विद्यार्थ्यांना जुनेच ड्रेस घालून यावे लागले. तर, काहींनी ऐपत नसनाताही खरेदी केला. आता कुठे गणवेशाचा प्रश्न सुटला. तर, आता बूट दिला जात आहे. मनपाने बूट खरेदीसाठीही ई-निविदा काढली होती. त्यात विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे एकत्रित दर ४९ लाख ९२ हजार ५५७ इतका निश्चित करण्यात आला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *