facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / सातारा डीसीसीवरप्राप्तिकर छापा

सातारा डीसीसीवरप्राप्तिकर छापा

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – नोटाबंदीच्या निर्णयानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आली आहे. मंगळवारी प्राप्तिकर विभागाने बँकेवर छापा टाकला. नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या नोटांच्या तपशीलाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक झाल्यानंतर प्राप्तिकर उपसंचालक पी. एस. स्वामी व प्राप्तिकर उपायुक्त आर. एस. पावशे यांच्यासह नऊ लेखापाल अधिकाऱ्यांचे पथक बँकेत दाखल झाले. त्यांनी व्यवस्थापनाकडून माहिती घेऊन तपासणी सुरु केली. नोटाबंदीनंतर नोटा स्वीकारण्याची मुदत जिल्हा बँकांना पाच दिवस मिळाली होती. त्यानंतर बँकांच्या व्यवहारावर निर्बंध घातले होते. या पाच दिवसांत सातारा जिल्हा बँकेने जुन्या नोटांच्या किती रक्कमा स्वीकारल्या याची तपशीलवार माहिती पहिल्या सत्रात घेण्यात आली. त्यानंतर (नो युवर कस्टमर) केवायसी प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. जिल्हा बँकेने या दरम्यान, सर्व शाखांचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झालेले १६५ कोटी रुपयांचे वितरण केले होते. याही व्यवहाराची उपायुक्त पावशे यांनी माहिती घेतली. या शिवाय एनपीए व जुन्या नोटांचे रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेले तपशील याची प्रक्रिया समजून घेण्यामध्ये लेखापालांनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच घायकुतीला आणले. रात्री सातनंतर पथकाने चौथ्या मजल्यावरील लॉकरकडे मोर्चा वळवला. उशीरापर्यंत लॉकरही तपासून पाहण्याची प्रक्रिया सुरूच असल्याची माहिती समोर येत होती. या संदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अथवा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे लॉकरमध्ये दडलय काय? हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला.

या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. संचालक मंडळासह बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवण्यात आले होते. या तपासणीच्या निमित्ताने जिल्हा बँकेवर छापा पडून लॉकर सील झाल्याच्या अफवांचा साताऱ्यात पसरल्या होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेचे दूरध्वनी सातत्याने खणखणत होते. नक्की काय घडले, याचा अंदाज राजकीय वर्तुळातून घेतला जात होता.

तपासणी नियमित प्रक्रियेचा भाग

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी बँकेवर छापा पडल्याचा स्पष्टपणे इन्कार केला. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार प्राप्तिकर विभागाने नोटीस देऊन केलेली नियमित तपासणी आहे. बँकेचे सर्व व्यवहार नियमानुसारच आहेत. केवायसी प्रक्रिया ९८ टक्के पूर्ण झाली असून, सर्व कर्ज वितरण आर्थिक चौकटीतीलच आहे. त्यामुळे खातेदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *