facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नाशिक / सुरक्षेच्या कारणास्तव बारा कैद्यांचे स्थलांतर

सुरक्षेच्या कारणास्तव बारा कैद्यांचे स्थलांतर

कैद्यांकडे मोबाइल सापडल्यामुळे चर्चेत आलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव १२ बंदिवानांना मंगळवारी पुण्यातील येरवडा व रायगडमधील तळोजा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरीत करण्यात आले. यातील बहुतांश बंदिवान हे खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेले आहेत.

सुमारे ३१९० एवढी क्षमता असलेले नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह आगोदरच कैद्यांमुळे ओव्हर फ्लो झाले आहे. त्यातच या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेतील काही मनुष्यबळ राज्यातील इतर कारागृहांच्या सुरक्षेसाठीही पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण होता. त्यातच या वर्षात या कारागृहात बंदिवानांत झालेल्या हाणामाऱ्या, खून, मोबाइल आढळून येणे यासारख्या गुन्हेगारी घटनांनी या कारागृहाची सुरक्षा यंत्रणा व प्रशासन बेजार झालेले आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी या कारागृहातील १२ बंदिवानांचे इतर कारागृहात स्थलांतर करण्यात आले. या बंदिवानांचे कनेक्शन डिसकनेक्ट करण्यासाठीही हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. कारण मोबाइलद्वारे कुणाशी तरी संपर्क करणारा बंदिवान कारागृहात आढळून आल्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील १२ बंदिवान सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा व येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहेत. यातील बहुतांश बंदिवान खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेले आहेत.

– रमेश कांबळे, कारागृह अधीक्षक, ना.रोड

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *