facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमाला चाेपड्यात आजपासून

सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमाला चाेपड्यात आजपासून

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – चोपडा येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या सालाबादाप्रमाणे यंदाही सुवर्ण महोत्सवी शारदीय व्याख्यानमालेचा ग्रंथालय सप्ताह २१ ते २७ डिसेंबर रात्री ९ वाजता, गांधी चौकात होणार आहे.

या व्याख्यानमालेचा प्रारंभ आज (दि. २१) पत्रकार राहुल रनाळकर, यांच्या व्याख्यानाने होणार आहे. यानंतर गुरुवारी (दि. २२) दुसरे पुष्प विनय पत्राळे, पुणे हे गुंफणार आहेत. शुक्रवारी (दि. २३) महेश अचिंतलवार यांचे व्याख्यान होईल. तर चौथे पुष्प डॉ. विश्वास पाटील, शहादा हे शनिवारी (दि. २४) गुंफतील. डॉ. रविराज अहिरराव यांचे व्याख्यान रविवारी (दि.२५) होणार आहे. तर अभिजित कुलकर्णी हे सोमवारी (दि. २६) सहावे पुष्प गुंफतील. सुवर्ण महोत्सवी व्याखानमालेचा समारोप संध्या पाठक, सांगली यांच्या सुश्राव्य कीर्तनाने मंगळवारी (दि. २७) होणार आहे. तरी व्याख्यानमालेचा आनंद घेण्यासाठी रसिक श्रोत्यांनी गांधी चौकात मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष आशीष गुजराथी, उपाध्यक्ष व सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. एस. टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॉ. परेश टिल्लू व संचालक मंडळाने केले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *