facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / जळगाव / इमारतींना बेसमेंट खुले करण्याच्या नोटिसा

इमारतींना बेसमेंट खुले करण्याच्या नोटिसा

जळगाव शहरातील मुख्य भागातील इमारती व व्यापारी संकुलांच्या पार्किंगचा गैरवापर केला जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिला आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी स्वातंत्र चौक ते काव्यरत्नावली चौक रस्त्यावरील १३ इमारतींची तपासणी करण्यात आली. यात १० इमारतींच्या बेसमेंटचा व्यावसायिक वापर होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने या जागा सील करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

शहरातील व्यापारी संकुले व इमारत‌ींच्या पार्किंगचा वापर वाहने लावण्याव्यतिरिक्त केला जात असेल, तर त्या पार्किंग तत्काळ मोकळ्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबत अभियंत्यांकडून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. नियमानुसार पार्किंग न सोडता त्या जागेचा गैरवापर होत असेल तर या जागा या मोहिमेत मोकळ्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिका नगररचना विभागाच्या अभियंत्यांकडून शहरातील इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. बांधकाम परवानगी, मंजूर नकाशे, प्रत्यक्षात केलेले बांधकाम व होत असलेला वापर याची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारपासून स्वातंत्र चौक ते काव्यरत्नावली चौक या रस्त्यापासून तपासणीची सुरुवात करण्यात आली. आयुक्त सोनवणे यांनीदेखील सायंकाळी जाऊन या तपासणीचा आढावा घेतला होता.

१० इमारती रडारवर

स्वातंत्र चौक ते काव्यरत्नावली चौक या रस्त्यावर १० इमारतींच्या बेसमेंटचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात मंगल कार्यालय, बँक, प्ले स्कूल, व्यवसाय, गॅरेज, हॉटेल, डान्स क्लास असा वापर होत आहे.

दंडात्मक कारवाई

बेसमेंटला पार्किंगच्या जागेचा गैरवापर होत असल्यास कारवाईसह दंडदेखील आकारला जाणार आहे. वापर करत असल्यापासून आजपर्यंतचा या जागेला
दंडदेखील आकारला जाणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

सील करण्याच्या नोटिसा

या इमारतधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यात तीन दिवसांत हा व्यावसायिक वापर थांबवावा, पार्किंगसाठीच (मंजूर प्रयोजनासाठी) तो करावा. अथवा या जागा सील करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *