facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / नाशिक / कांदा कोसळला; शेतकरी संतापला

कांदा कोसळला; शेतकरी संतापला

केंद्र व राज्य सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सटाणा बाजार समितीत कांद्याचे दर अचानक कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद पाडून विंचुर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले. यामुळे तब्बल तीन तासांहून अधिक काळ राज्य महामार्गा बंद होता.

दरम्यान, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व बाजार समिती सभापती यांनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून लिलाव पूर्ववत सुरू करण्यास विनंती केल्याने कांदा लिलाव उशिरा सुरू करण्यात आले.

बुधवारी सकाळी बाजार समितीच्या देवळा रस्त्यावरील नव्या जागेत शेतकऱ्यांनी ८०० हून अधिक ट्रॅक्टर भरून कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच राज्य व केंद्र सरकारने निर्यात कांद्यावरील सबसीडी ३१ डिसेंबर १६ पासून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त धडकले. यामुळे कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडून थेट राज्य महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासन व पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले. परिणामी राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरापर्यंत त्याचे लोण पसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तहसीलदार आबासाहेब तांबे, पोलिस निरीक्षक बशीर शेख, बाजार समिती सभापती रमेश देवरे, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, शेतकरी नेते जिभाऊ खंडू आदींनी आंदोलकांशी चर्चा केली.

कांदा उत्पादक जिभाऊ खंडू म्हणालेत की, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांच्या मरणाला प्रोत्साहन देणारे आहे. शेतकरी देशोधडीला लावण्याचा सरकारचा कुटील डाव असल्याची भावना व्यक्त केली. या रास्ता रोको आंदोलनात कांदा उत्पादक अनंत शेवाळे, भरत पवार, शिवाजी शेवाळे, योगेश सोनवणे, शिवाजी ठोके, अशोक सोनवणे, विजय जाधव, केवळ सांळुखे, देविदास ठाकरे, विकी अहिरे, संतोष बिरारी, शाम पगार, रवींद्र गुंजाळ, सुनील दातरे, निंबा रौंदळ, नीलेश सूर्यवंशी, प्रवीण बोऱ्हाडे, लक्ष्मण देवरे, चेतन सोनवणे, सुरेश देवरे, राजेंद्र ठाकरे, सुनील दात्रे, आदी शेतकरी उपस्थित होते.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *