facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नागपूर / गोंदियात हॉटेलला आग; सात ठार

गोंदियात हॉटेलला आग; सात ठार

स्थानिक गोरेलाल चौकातील बिंदल प्लाझा हॉटेलला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आगीपासून सुटका करून घेण्यासाठी तिसऱ्या मजल्यारुन उडी मारणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याचे उपचारासाठी रुग्णालयात नेताना निधन झाले.

या आगीत मरण पावलेले सर्वजण गोंदिया येथील पंकज साडी सेंटरचे संचालक चिनू अजमेरा यांच्याकडील विवाहासाठी पाहुणे म्हणून आले होते. मृतकांसह अन्य काही पाहुण्यांची व्यवस्था मुख्य बाजारपेठेतील हॉटेल बिंदल प्लाझामध्ये करण्यात आली होती. बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास हॉटेलला अचानक आग लागली. या आगीत हॉटेलचे चारही मजले जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तब्ब्ल चार तासानंतर हॉटेलबाहेरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्न‌िशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. मात्र, त्यांना जीवितहानी टाळता आली नाही. ‌आगीत अडकलेल्या अन्य ११ जणांना वाचविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आगीच्या घटनेसंदर्भात कुणावरही गुन्हा दाखल केला नव्हता.

काय घडले?
बिंदल प्लाझा हॉटेलमधील ‘झी महासेल’ या अस्थायी दुकानात शॉर्टसर्किट
दुकानातील प्ला‌िस्टकच्या सामानामुळे आग पसरली
झी महासेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बंद हॉटेलमधील व्यावसायिक सिलिंडरचे स्फोट
सिलिंडरच्या स्फोटांमुळे आग वरच्या मजल्यांवर पसरली
शॉर्टसर्किटमुळे लिफ्ट बंद झाली.
बाहेर पडण्यास जागा नसल्यामुळे सहा जणांचा होरपळून मृत्यू

सिलिंडरचे स्फोट
हॉटेल बिंदल प्लाझामधील थाटबाट रेस्टॉरंट दीड महिन्यांपासून बंद आहे. या बंद रेस्टॉरंटमध्ये १० ते १५ भरलेले व्यवसायिक सिलिंडर होते. या सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. याच इमारतीच्या वरच्या माळ्यावरही एका खोलीत ३० ते ३५ सिलिंडर होते, अशी माहिती अ‌ग्निशमन दलाच्या पथकाने दिली.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *