facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / मुंबई / पंकजा मुंडे यांना क्लीन चिट

पंकजा मुंडे यांना क्लीन चिट

अंगणवाड्यांमधल्या चिक्की घोटाळा प्रकरणात राज्याच्या महिलाविकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे अडचणीत आल्या होत्या. मात्र हा घोटाळाच घडला नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केले आहे. एसीबीने या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची फाइल बंद केली आहे.

अंगणवाडीसाठीच्या वस्तूंसाठी नियमांना डावलून एकाच दिवशी २४ कोटींची कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, एका दिवसात किती कंत्राटे द्यायची याचा पूर्ण अधिकार संबंधित मंत्री आणि खात्याचा असल्याचे स्पष्टीकरण एसीबीने दिले आहे. एका दिवसात किती कंत्राटे द्यावीत याबाबत कोणतीही नियमावली नाही. शिवाय कंत्राटदारांची निवड यादीतून होत असल्याने ई-टेंडरिंगची गरज नाही. लाखो अंगणवाड्यांना चिक्की, चटई, पुस्तके, खेळणी यासारख्या वस्तूंची गरज असतेच. त्यामुळे या वस्तू मोठ्या प्रमाणात मागवल्याने सरकारी नियमांचा भंग झालेला नाही. खाद्यपदार्थांची गुणवत्ता खराब असल्यास दोषींवर संबंधित विभागाकडून तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण एसीबीने दिले आहे. मात्र या घोटाळ्यात करण्यात आलेल्या आरोपानुसार सबळ पुरावे मिळून न आल्याने एसीबीने पंकजा मुंडेंना क्लीन चिट दिली असल्याचा अहवाल गृहविभागाला पाठवला असल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिका‍ऱ्याने सांगितले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *