facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘पेटीएम’ नोकरभरतीत तरुणांना गंडा

‘पेटीएम’ नोकरभरतीत तरुणांना गंडा

पेटीएम या ऑनलाइन कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पैसे उकळणाऱ्या दोघांना बुधवारी सायबर सेलने बेड्या ठोकल्या. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरातील एका स्थानिक वृत्तपत्रात पेटीएममध्ये नोकरीसाठी दहावी बारावी, पदवीधर मुले पाहिजेत. पगार सोळा हजार १६६ रुपये अशी जाहिरात आली होती. या जाहिरातीवरील मोबाइल क्रमांकवर कॉल केल्यानंतर

तरुणांना बुधवारी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हॉटेल मोदी सम्राटमध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. येथे काही उमेदवारांना कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या वतीने नोकरी लागल्यावर अर्ध्या पगाराची मागणी करण्यात आली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने खबऱ्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना ही माहिती दिली. त्यांनी सायबर सेलचे पथक पाठवून छापा मारला. मुलाखत घेणारे अभिजित हरीदास दहिवाळकर (रा. भोसरी, आळंदी, पुणे) व राजू गंगाराम बोरगावकर (रा. पौर्णिमानगर, नांदेड) यांना कागदपत्रासहीत अटक केली.

या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम कंपनीने मुंबई येथील योमा कन्सलटन्सीला उमेदवार भरतीचे काम सोपवले होते. योमा कंपनीकडून पुणे येथील प्लेसवेल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लेसवेल कंपनीने नांदेड येथील अनुप्रीत सर्व्हिसेसला हे कंत्राट दिले. अनुप्रीतच्या वतीने उमेदवारांना पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मोहसीन शेख सिकंदर शेख (रा.पुष्पक गार्डन, मदिना मशीदजवळ, चिकलठाणा) या बेरोजगाराच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती यांनी केली.

अन् मूळ कागदपत्रे मिळाली

मुलाखतीला आलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे मुलाखातीचे फॉर्म भरताना शंभर रुपये फीससह दहिवाळकर व बोरगावकर यांनी स्वतःकडे ठेवून घेतली होती. पोलिसांनी ही कागदपत्रे देखील जप्त केल्याने बेरोजगार उमेदवार हवालदिल झाले. मात्र, सायबर सेलने त्यांची जप्त केलेली मूळ कागदपत्रे त्यांना पुन्हा स्वाधीन केली. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *