facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / जळगाव / सारंगखेड्यात अश्व संग्रहालय?

सारंगखेड्यात अश्व संग्रहालय?

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडामधील चारशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणारा एकमुखी दत्ताचा यात्रोत्सव आणि येथील अश्व प्रदर्शन सोहळ्याचे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. या यात्रोत्सवाला शासनाचे पाठबळ देवून जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू. तसेच सारंगखेड्यात अश्व संग्रहालय उभारण्यास शासन अनुकूल असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सारंगखेडा, ता. शहादा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल या कार्यक्रमानिमित उत्तर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळा व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, डॉ. विजयकुमार गावित, उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुवर रावल, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पर्यटन विभागाच्या वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज, विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, चेतक महोत्सवाचे अध्यक्ष जयपालसिंह रावल आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्योजक सुभाष रुणवाल, सरकारसाहेब रावल, किशोर खाबिया, डॉ. तुषार देवरस यांना करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्याची माहिती देणारे मोबाइल अॅप व संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चेतक फेस्टिव्हलला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा मंत्री रावल यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नाला शासनाचे पूर्ण पाठबळ आहे. काळाच्या ओघात अडचणीत आलेली आदिवासी संस्कृती ही प्राचीन व समृद्ध संस्कृती असून, या संस्कृतीचे पुनरूज्जीवन करून संवर्धन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अत्याधुनिक अश्व संग्रहालय व संशोधन केंद्र तयार करण्यास शासन अनुकूल आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *