facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / ४६ मिनिटांत ११०० कोटींच्या कामांना मंजुरी

४६ मिनिटांत ११०० कोटींच्या कामांना मंजुरी

महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने वॉर्डातील रखडलेली कामे मार्गी लावण्याची सर्वपक्षीय लगबग सध्या सुरू आहे. त्यातच, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून मांडण्यात आलेले एकूण ११०० कोटी रुपयांचे ७४ कामांचे प्रस्ताव अवघ्या ४६ मिनिटांत मंजूर करण्यात आले. विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकी दाखवत हे प्रस्ताव मंजूर केले.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालिकेत जेवढ्या बैठका होतील, त्यात जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करण्याकडे दोन्ही बाजूंचा कल आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत फारशी चर्चा न होता ७४ प्रस्ताव मान्य करण्यात आले. त्यात, शाळांची डागडुजी व पुनर्बांधणीसाठी ७३ कोटी, पाणीगळती रोखण्यासाठी ४५ कोटींची कामे, बोरिवली पूर्व येथे ५३ कोटी खर्चून ११ मजली रुग्णालय, भायखळा प्राणीसंग्रहालयातील अण्णाभाऊ साठे प्रेक्षागृहाचे नुतनीकरण करण्यासाठी ३५ कोटी, घाटकोपर आणि मानखुर्द येथील उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी ४४५ कोटी असे एकूण ११०० कोटी रुपयांचे प्रस्ताव होते. मागील काही बैठकांतही कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा न करता मान्यतेची मोहोर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी उमटवली. दोन आठवड्यांपूर्वी, अवघ्या २० मिनिटांत सव्वाशे कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *