facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / नागपूर / अडीच लाख कुटुंबांना आजपासून सिलिंडर

अडीच लाख कुटुंबांना आजपासून सिलिंडर

प्रदूषण होऊ नये, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी घरातील चुली बंद करून स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू करून या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. घराघरांत आज स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर वाढत असला तरी नागपूर जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांमध्ये आजही मातीच्या चुली किंवा केरोसीनचा वापर केला जात आहे. हा धूर कमी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातही आज, शुक्रवारपासून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी कस्तूरचंद पार्क येथे दुपारी २ वाजता पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, नागपूरचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.

पाच कोटी घरांचे उद्दिष्ट

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे २०१६ रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे उद्घाटन झालेल्या या योजनेंतर्गत ५ कोटी एलपीजी कनेक्शनसाठी कुटुंबांना प्रतिजोडणी १६०० रुपयांचे अर्थसहाय्य येत्या तीन वर्षांत दिले जाणार आहे. चालू वर्षात १.५ कोटी कनेक्शन्स वितरित करण्याचे लक्ष्य आहे. देशातील १५ राज्यांत सध्या ही योजना कार्यरत आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लक्ष दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.

हे चित्र बदलणार!

महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर जिल्ह्यात साडेदहा लाख कुटुंबे राहतात. यापैकी ८ लाख १७ हजार ९७ कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर करतात. उर्वरित २ लाख ३२ हजार ९०३ कुटुंबांडे आजही मातीच्या चुली किंवा केरोसीनचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणाची हानी होऊन अनेकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात रॉकेलचाच वापर केला जात होता. २००६ ची स्थिती बघितली तर नागपूर जिल्ह्यात ७० लाख लिटर केरोसिन विकले जात होते. वाढत्या एलपीजीच्या प्रमाणामुळे केरोसिनचा वापर कमी होत गेला. सध्याची स्थिती बघितली तर दर महिन्याला नागपूर जिल्ह्यात १५ लाख ९६ हजार लिटर केसोरिन विकले जाते.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *