facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / गांधी-आंबेडकरांचे विचार समजून घ्यावेत

गांधी-आंबेडकरांचे विचार समजून घ्यावेत

‘महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे विचार भारतीयांनी नीटपणे समजून घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. मार्क लिंडले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे मार्क लिंडले यांचे गुरुवारी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे होते. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा, बीसीयुडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, संचालक डॉ. सुधीर गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांची जातविषयक चिकित्सा’ या विषयावर डॉ. लिंडले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. लिंडले यांनी ’पॉवर पाँईट प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून विषयाचे विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, भारतात आल्यानंतर सर्वाधिक काळ मी, गांधी व आंबेडकर यांचे विचार यावर अभ्यास केला. या दोघांमध्ये अनेक मुद्यावर मतभेद जरी असले तरी काही मुद्यांवर एकमत होते. विशेषत: या दोद्यांचाही भांडवलशाहीला कडाडून विरोध होता.

गांधीजींना सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांचे जातीविषयक विचार पटले नाही. पण, १९३१ मध्ये गोलमेज परिषदेनंतर बाबासाहेबांचा अस्पृश्यता निवारणाचा विचार गांधीजींना पटला. तथापि तत्कालीन जातीय व्यवस्थेची चौकट तत्काळ मोडित निघाल्यास यांचे नुकसान स्वातंत्र्य लढ्याला होऊ शकते, अशी गांधीजींची भूमिका होती. या दोन्ही महापुरुषांचे विचार भारतीयांनी नीटपणे समजून घेणे गरजेचे असेही प्रा. लिंडले म्हणाले. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रो. चोपडे यांनी भारतातील महापुरुषांचा विचारांचा आढावा घेतला. तर डॉ.देसरडा यांनी गांधी-आंबेडकरांचे विचाराचे महत्त्व सांगितले. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *