facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / बंदमुळे शिरपुरात अघोषित संचारबंदी

बंदमुळे शिरपुरात अघोषित संचारबंदी

शिरपूरमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने माजी मंत्री अमरिश पटेल, आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शहरातून सकाळी मोर्चा काढून प्रातांधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चासाठी शिरपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीसदृश्य वातावरण होते.

शिरपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी, मोटरसायकल चोरी, रस्तालूट, दरोडा, अवैध व्यवसाय, बनावट मद्य निर्मितीचे प्रकार वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी बँकेवर दरोडा टाकून दहा लाख सव्वीस हजार रूपये दरोडेखोरांनी लुटून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलिसांचा धाक चोरट्यांना राहिला नसल्याचा दावा करीत या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. विजयस्तंभापासून ते प्रातांधिकारी कार्यालयापर्यत नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. दवाखाने, बससेवा, अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *