facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / जळगाव / ब्रिटीशकालिन चर्च नाताळसाठी सज्ज

ब्रिटीशकालिन चर्च नाताळसाठी सज्ज

ब्रिटीश राजवटीत भुसावळला रेल्वे सुरू झाल्यापासून ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने शहरात वास्तव्यास आला. त्यांचे सण-उत्सव साजरे होऊ लागले. त्यासाठी अनेक चर्च बांधली गेली. येत्या नाताळच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक महत्त्व लाभलेली ही चर्च आता सजू लागली आहे.

नाताळनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन चर्चतर्फे करण्यात आले आहे. २४ रोजी चर्चची सजावट, २५ रोजी सकाळी ९ वाजेपासून ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना, २६ रोजी दुपारी खेळ, २७ रोजी संडे स्कूल, २८ रोजी चर्च पिकनीक, २९ रोजी चित्रकला स्पर्धा, ३० रोजी प्रीति भोजन, ३१ रोजी रात्री नऊ वाजता भजन व वॉचनाइट सर्व्हिस, १ रोजी नवीन वर्ष उपासना व प्रभुभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

सेक्रेट हार्ट चर्च

शहरातील गार्ड लाइनमध्ये हे रोमन कॅथेलिक चर्च आहे. १८५४ मध्ये त्याची स्थापना झाली आहे. संत व्हिन्सन डिपॉल ही संस्था या अंतर्गत सामाजिक उपक्रम राबवत असते. गरिबांना मदत करण्याचे मुख्य कार्य येथून केले जाते. फादर जोसेफ डेनिस हे धर्मगुरू चर्चमधील सर्व धार्मिक कार्य पाहत असतात. शहरातील हे सर्वात जुने चर्च आहे.

अलायन्स मराठी चर्च

१८ जुलै १८८७ रोजी, अलायन्स मराठी चर्चची स्थापना मॉर्डन रोडवर करण्यात आली. पास्टर नाशिककर हे धर्मगुरू प्रार्थनास्थळाचे काम पाहत आहेत. या चर्चचे सदस्य भुसावळ शहर शांतता कमिटीमध्ये आहेत. नाताळनिमित्त २५ रोजी विविध धर्मगुरूंना निमंत्रित करून सन्मानित करण्यात येते. या उपक्रमाद्वारे जातीय सलोखा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

संत पॉल चर्च

संत पॉल चर्च हे सीएनआय मराठवाड्याची शाखा आहे. रेल्वे रुग्णालयासमोर हे प्रार्थनास्थळ आहे. रेव्हरंड प्रवीण घुले हे धार्मिक विधी बघतात. २५ डिसेंबर १९२७ ला हे चर्च बांधण्यात आले. या चर्चच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. पाच एकर जागेत हे प्रार्थनास्थळ आहे.
अलायन्स हिंदी-इंग्लिश हे चर्च रेल्वे रुग्णालय रोडवर आहे. रेव्हरेंट पॉल. एच. शहा हे या चर्चचे धार्मिक विधी बघतात.

असेंबली ऑफ गॉड

हे चर्च पंधरा बंगला येथे वरणगाव रस्त्यावर १९१० मध्ये तयार केले गेले. २०१४ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. १९६७ पूर्वी शहरात केवळ सेंट अलायन्स ही एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा होती. रेव्हरंड सॅमसंग सावता यांनी १९६७ ला चर्च परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. रेव्हरंड सुरेश लारा हे या चर्चचे धार्मिक कार्य सांभाळतात, अशी माहिती देण्यात आली.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *