facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / शिवस्मारकाला असलेला मच्छीमारांचा विरोध मागे

शिवस्मारकाला असलेला मच्छीमारांचा विरोध मागे

मासेमारी व्यवसाय संकटात येण्याच्या भीतीनं मुंबईतील मच्छीमारांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाला दर्शवलेला विरोध अखेर मावळला आहे. मच्छीमारांच्या मागण्यांवर गांभीर्यानं विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असून त्यांच्या आश्वासनानंतर मच्छीमार संघटनांनी आपला विरोध मागं घेतल्याचं समजतं.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. मात्र, या स्मारकाला विरोध करत भूमिपूजनाच्या वेळी विरोध प्रदर्शन करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला होता. ज्या खडकावर शिवस्मारक बांधण्यात येणार आहे, तिथं माशांच्या ३२ प्रजाती प्रजनन करतात. हा प्रकल्प झाल्यास त्या प्रजातीच नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय, मच्छीमारांच्या रोजगाराचेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

मच्छीमारांच्या या समस्यांवर चर्चा करण्यासाठी काल दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, सुरुवातीला त्यावर काहीही तोडगा निघाला नव्हता. शेवटी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री पुन्हा एकदा मच्छीमार कृती समितीची बैठक घेतली. उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांचं म्हणणं ऐकून घेतलं व त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा शब्द दिला. मासेमारीची सीमा जास्तीत जास्त ठेवणे, स्मारकातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मच्छिमारांच्या मुलांना प्राधान्य देणे आणि मच्छिमारांच्या पंधरा प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करणे या मागण्यांवर एकमत झाल्यानंतर स्मारकाला असलेला विरोध मागं घेण्यात आला. त्यामुळं शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा सुरळीत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *