facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘आरटीओ’ची लाखोंची वसुली

‘आरटीओ’ची लाखोंची वसुली

आवाज न्यूज नेटवर्क – 

अहमदनगर – बेकायदा पद्धतीने वाळू व इतर प्रकारच्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जात आहे. वाळू वाहतुकीत विनानंबरच्या वाहनांचा वापर वाढला आहे, तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक केली जात आहे. या प्रकारांवर आरटीओ विभागाने कारवाई केली असून गेल्या दीड वर्षात २६ लाखांचा दंड वसूल केला आहे. शंभर प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यालयाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने अवजड वाहनांच्या कारवाईत सातत्य राहिलेले नाही.

जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतूक जोरात सुरू आहे. या प्रकारात विनानंबरच्या वाहनांचा वापर वाढला आहे. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे या गैरप्रकारांवर कारवाई करण्याच्या सूचना आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आरटीओ अधिकाऱ्यांच्या पथकाने या वाहनांवर कारवाई केली आहे. एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१६ या दीड वर्षात केलेल्या कारवाईत दहा वाहने विनानंबरची सापडली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या १६८ वाहनांवर कारवाई केली आहे. दहा जणांचे परवाने निलंबित केले आहेत. यामधील शंभर प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तसेच, २६ लाख १२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.

गौण खनिजाची वाहतूक करण्याच्या प्रकारात नंबर नसलेल्या वाहनांचा वापर वाढला आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली जात असल्याने या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

– राजाराम गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *