facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / दोन बसची टक्कर; पाच ठार, दहा गंभीर

दोन बसची टक्कर; पाच ठार, दहा गंभीर

आवाज न्यूज नेटवर्क – 

औरंगाबाद – येणेगुरजवळ दोन बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह पाच जण जागीच ठार, तर २६ जण जखमी झाले. यातल्या १० जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उमरगा येथून पुण्याकडे निघालेली इंदापूर आगाराची बस (क्रमांक एमएच १४ बीटी ३२५४) आणि तुळजापूरहून आळंदकडे निघालेली कर्नाटकातील आळंद डेपोची बस (क्रमांक केए २८ एफ १६०३) यांची मुंबई – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग-उमरगा दरम्यानच्या येणेगुरजवळ धडक झाली. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातातील मृतांमध्ये दोन बसच्या चालकांसह दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शिवाजी मारुती साळुंके, वामन मारुती साळुंके, लक्ष्मण दत्तात्रय म्हेत्रे (वांगी, ता. भूम, बसचालक), आंबराया शिवराया तेलीकुणे (रा. आळंद), राहुल रमाकांत कठारे (रा. मुरुम ता. उमरगा) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *