facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / मुंबई / पवई तलावात हाऊसबोट उलटली; तिघे बेपत्ता

पवई तलावात हाऊसबोट उलटली; तिघे बेपत्ता

मुंबईतील पवई तलावात शुक्रवारी रात्री हाऊस बोट उलटून आठजण बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी पाचजणांना वाचवण्यात यश आले असून तिघे अद्यापही बेपत्ता आहेत.

शुक्रवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. पाण्यात बुडालेले सर्व लोक पार्टी करण्यासाठी जात होते. एका खडकाला अडकून त्यांची हाऊसबोट उलटल्याचं सांगितलं जातं. बेपत्ता लोकांचा शोध सुरू असल्याचं समजतं.
पवई तलावात हाऊसबोट वापरण्यास बंदी आहे. असं असतानाही हाऊसबोट पाण्यात कशी घातली गेली? त्यासाठी संबंधितांना कोणी परवानगी दिली?; याचीही चौकशी सुरू आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *