facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / ‘पोलिसांचा दबाव झुगारून काम करा’

‘पोलिसांचा दबाव झुगारून काम करा’

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका युतीमध्ये वा स्वबळावर लढविताना स्थानिक पोलिसांसह इतर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर तो झुगारून पूर्ण ताकदीनिशी काम करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

आगामी महापालिका तसेच ‌जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मातोश्रीवर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक बोलाविण्यात आली होती, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. निवडणुका युती म्हणून लढवायच्या की स्वबळावर त्याचा निर्णय मी परिस्थिती पाहून घेणारच आहे. मात्र तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा, असे उद्धव यांनी सांगितल्याचे कळते.
यावेळी काही आमदारांनी पोलिसांकडून बऱ्याचदा पक्षाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती दिली. त्यावर बोलताना पोलिस राजकीय दबावाखाली झुकून काम करीत असले तरी तुम्ही मात्र दबावाला झुगारून काम करा. शिवसैनिकांना या परिस्थितीचा चांगलाच अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरा, असेही उद्धव यांनी सांगितल्याचे कळते.

काही आमदारांनी अद्यापही मंत्र्यांसोबत योग्य संवाद सुरू नसल्याचे सांगताच आपण यात जातीने लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदारांसोबत मंत्र्यांनी मतदारसंघात फिरायला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शनिवारी होणाऱ्या शिवस्मारकाच्या भुमिपूजन कार्यक्रमात भाजप आपली ताकद दाखवित असल्याचा विषय निघाला असता शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे आणि ती दिसेलच, असेही ते म्हणाल्याचे कळते.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *