facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / मारहाण करणाऱ्यांना शिक्षा

मारहाण करणाऱ्यांना शिक्षा

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – जमिनीच्या वादावरून एकाला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. नलगे यांनी दिली. बबन कासम सय्यद, रशीद बबन सय्यद, र्ईमान बबन सय्यद, शाबिरा बबन सय्यद (रा. वाटेफळ, नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहे. मारहाणीचा गुन्हाची फिर्याद देणारा याकुब वजीर शेख याला जमिनीच्या वादातून या चार जणांनी क्रिकेट बॅटने मारहाण केली होती. या प्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात सुनावणी होऊन चार आरोपींचा दोष ठरविण्यात आले. या खटल्यात पाच साक्षीदार होते. परंतु, हे सर्व साक्षीदार फितूर झाले. केवळ वैद्यकीय पुराव्यावर या आरोपींना शिक्षा झाली आहे.

अपघातात एक ठार

नगर-दौंड मार्गावरील नगर तालुक्यातील हिवरे झरे या गावाच्या शिवारात दुचाकीवर असलेल्या अज्ञात व्यक्तीचा अज्ञात वाहनाची धडक होऊन मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. मरण पावलेली व्यक्ती एमएटी गाडीवरून (एच १६, डी ७५९५) नगरच्या दिशाने येत होती. या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनला मिळाली. पोलिसांनी या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या व्यक्तीचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असून, तिच्या नातेवाइकांनी पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन नगर तालुका पोलिसांनी केले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *