facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / मिशन ‘फोर्टी प्लस’

मिशन ‘फोर्टी प्लस’

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर जिल्हा भाजपने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेत ‘फोर्टी प्लस’ (४०पेक्षा जास्त) सदस्य निवडून आणून अध्यक्ष भाजपचाच करण्याचे निश्चित करण्यात आले. या दृष्टीने इच्छुकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू करण्याच्या सूचनाही केल्या गेल्या.

गांधी मैदानातील भाजप कार्यालयात जिल्हा भाजपची शुक्रवारी दुपारी बैठक झाली. पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासह विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर तसेच अरुण मुंडे, सूर्यकांत मोरे, अॅड. युवराज पोटे, दिलीप लांडे, शामराव पिंपळे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब पोटघन, अशोक खेडकर, अॅड. शिवाजी अनभुले, बबन मुठे, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अॅड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या ‘मिशन ४० +’ची घोषणा केली. जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगरपरिषद निवडणुकांचा निकाल पाहता भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, शिवाय जिल्ह्यातील व तालुकास्तरीय शासकीय समित्या जाहीर केल्या आहेत. याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होण्यासाठी जोमाने प्रसार करावा व शासनाच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचवावी असे त्यांनी सांगितले.

विभागीय संघटन मंत्री काळकर यांनी प्रत्येक तालुक्याच्या गण-गटाच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्याची सूचना केली. जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी पक्षाच्या तालुकानिहाय मेळाव्यांची माहिती दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *