facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / शेकडो माओवाद्यांचा हैदोस

शेकडो माओवाद्यांचा हैदोस

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाला माओवाद्यांनी विरोध दर्शविल्यानंतरही काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सुमारे शंभरावर माओवाद्यांनी शुक्रवारी लोहखनिज वाहतुकीसाठी आणलेली सुमारे ५० वाहने पेटवून दिली. आजवरची ही सर्वात मोठी जाळपोळीची घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश, ओडिशा सीमेवरही माओवाद्यांनी सात वाहने जाळून एका सरपंचाची हत्या केली आहे.

सूरजागड पहाडावर लोहखनिज उत्खननाचे काम ‘लॉयड मेटल’ या कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून कंपनीने या भागात सक्रिय हालचाल सुरू केली होती. माओवाद्यांचा विरोध झुगारून सुरुवातीला दहा किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रस्ता कंपनीने घनदाट जंगलात बनविला. त्यानंतर पहाडावर लोहखनिजाचे उत्खनन सुरू केले. परिसरातील गावकऱ्यांनी याला विरोध दर्शवित आंदोलन उभारले. मे महिन्यानंतर कंपनीने या भागातील उत्खनन बंद केले होते. पावसाळा संपताच आता पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. रस्ता दुरुस्तीसोबतच लोहखनिज उत्खनन केले जात होते. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उत्खननानंतर लोहखनीज वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक जमा होते. हे काम सुरू असताना पाचशेवर माओवादी समर्थकांसह आले. ट्रकचालकांना एका ठिकाणी गोळा करून त्यांच्याकडे असलेले मोबाइल हिसकावून घेतले. त्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. ट्रक आणि जेसीबीची पेट्रोल टाकी फोडून वाहने पेटवून दिली. पेटवून दिलेल्या वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, दुपारी ३ वाजतापर्यंत ट्रकचालकांना माओवाद्यांनी ओलिस ठेवले होते. एक ट्रकचालक बेशुद्धही झाला होता. परत जाताना हे काम बंद करण्याची ताकीदही माओवाद्यांनी दिली आहे. दरम्यान, वाहनांच्या जाळपोळीनंतर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी हेलिकॉप्टरने पाहणी केली.

–इतर दलम सहभागी?

जाळपोळीची ही घटना स्थानिक दलमने घडविली असली तरी यात उपस्थित माओवाद्यांचा आकडा लक्षात घेता बाहेरून मोठया प्रमाणात माओवादी आल्याचा अंदाज आहे. माओवाद्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने या भागात कंपनीचे काम सुरू राहील काय यासंदर्भात साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, माओवाद्यांचा या भागाच्या विकासाला विरोध असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले अशी टीका पोलिसांच्या पत्रकातून करण्यात आली आहे.

–२०१३मध्ये काय घडले?

१३ जून २०१३ला माओवाद्यांनी लॉयल कंपनीला सूरजागडच्या पायथ्याशी मोठा हादरा दिला होता. कंपनीचे उपाध्यक्ष जसपाल सिंग धील्लन आणि खनिकर्म उत्खनन करणारे मल्लिकार्जून रेड्डी आणि सूरजागडचे पोलिस पाटील राजू शेडमाके या तिघांची हत्या केली होती. हा प्रकल्प आदिवासीविरोधी असल्याचा आरोप केला होता. प्रकल्पाला माओवाद्यांचा विरोध असतानाही धील्लन आणि रेड्डी हे चर्चा करण्यासाठी गेले होते.

–पेटविलेली वाहने
–पोकलँड : ०१
–जेसीबी : ०३
–ट्रक : ५०

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *