facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / ४० हजार टीव्ही होणार बंद!

४० हजार टीव्ही होणार बंद!

आवाज न्यूज नेटवर्क – 

जळगाव – शहरात आणि ग्रामीण भागात केवळ केबलद्वारे आपण आपल्या घरात टी. व्ही. पाहात असाल, तर १ जानेवारीपासून तुम्हाला टीव्ही केबलवर पाहता येणार नाही. त्यासाठी घरात सेट टॉप बॉक्स बसवणे अनिवार्य ठरणार आहे. अद्याप जिल्ह्यातील ४६ हजारावर केबल ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख केबल कनेक्शन आहेत. केंद्र सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय यांनी ११ सप्टेंबर २०१४ च्या अधिसूचनेनुसार केबल टीव्ही डिजिटायजेशनचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत आहे. यामुळे जिल्ह्यातील केबलचालक व ग्राहक यांना वेळोवेळी आवाहन करून सेट टॉप बॉक्स बसवून घेण्याची विनंती केली होती. यानुसार आतापर्यंत १ लाख केबल ग्राहकांपैकी केवळ ५५०४६ ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवून घेतले आहे. अद्यापही ४६२४७ ग्राहकांनी बॉक्स बसवून घेतलेले नाहीत. ३१ डिसेंबरनंतर सेट टॉप बॉक्स न बसवलेल्या ग्राहकांना अनॉलॉग सिग्नल बंद केले गेल्याने टीव्ही पाहता येणार नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत हे सेट टॉप बॉक्स बसवून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *