facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / जळगाव / किशोर महोत्सवाचा समारोप

किशोर महोत्सवाचा समारोप

शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वज‌निक विद्यालयात शनिवारी किशोर महोत्सवाचा समारोप गंधे सभागृहात बक्षीस वितरणाने करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नटराजस्तवन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीच्या सभापती डॉ. वर्षा खडके, पारसमल कांकरिया, मुख्याध्‍यापक दुर्गादास मोरे, पर्यवेक्षक व्ही. एल. जगताप, बी. एम. साळुंखे, प्रणिता राजहंस, लियाकत तडवी यांच्याहस्ते साने गुरुजी व देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रदीप तळवलकर यांनी करून दिला.
किशोर महोत्सव २०१६ अंतर्गत घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, गीतगायन, वैयक्तिक गुणदर्शन, संगणकीय स्पर्धा, रांगोळी, संस्कृत स्पर्धा, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद बाजार, विविध विषयांचे तक्ता प्रदर्शन, हस्तकला, गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्‍ते बक्षीसे देण्यात आली. सूत्रसंचालन राजश्री कुळकर्णी यांनी केले. बक्षीस वितरणाचे वाचन सुरेश कुळकर्णी यांनी केले. आभार वर्षा ढेपे यांनी मानले.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *