facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / लसूण, तेलाची फोडणी

लसूण, तेलाची फोडणी

गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याचे घसरलेले दर जैसे थे राहिले आहेत. तूरडाळीच्या दरात मात्र आणखी दहा रुपयांची घट झाली आहे. गव्हाचे दरही एक ते दोन रुपयांनी कमी झाले आहेत. तर हिरवा वाटाण्याच्या शेंगा तसेच बोरांची मोठी आवक झाली आहे. शाबू व तेलाचे दर मात्र चढेच राहिले आहेत. लसणेच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याची आवक सुरू आहे. बाजारात भाज्यांना मागणी नसल्याने घसरलेले दर जैसे थे राहिले आहेत. पालेभाजी तसेच टोमॅटोचे दर फारच कमी झाले आहेत. त्यामुळे विक्रेते टोमॅटोचा किलोचा दर सांगण्याऐवजी दीड किलो, सव्वा किलो असा सांगत आहेत. हिरवा वाटाण्याच्या शेंगा, गाजर, बोरांचा हंगाम जोरात आहे. गाजर ३० रुपये, वाटाणा ४० रुपये किलो, बोरे ३० ​रुपये असा गेल्या आठवड्यातील दर कायम आहे. गावठी बोरांचा दर ६० रुपये किला आहे. पण त्याची आवक फार होत नाही. लसूणच्या दरात मात्र वाढ झाली आहे. ८० ते १०० रुपयापर्यंत असणारी लसूण या आठवड्यात १४०रुपयापर्यंत पोहचली. जुना माल असल्याने दर वाढले आहेत. येथून पुढे मसाला करण्याचे प्रमाण वाढत असल्याने लसूण दरात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

किराणा बाजारातील दरही जैसे थे आहेत. तूरडाळीसारख्या डाळीच्या दरात घसरण सुरुच आहे. एक किलोचा दर या आठवड्यात ११० रुपयांवर खाली आला आहे. दोन व तीन नंबरच्या डाळीचा दर तर ९० रुपयापर्यंत आहे. नवीन डाळ बाजारात येत असल्याने दर उतरत असल्याचे सांगितले जात आहे. हरभरा डाळीचा दर मात्र अजूनही जैसे थे आहे. अन्य डाळींचे दर जैसे थे आहेत. गहू व ज्वारीचे दर दोन आठवड्यापूर्वी वाढले होते. या आठवड्यात गव्हाच्या दरात एक ते दोन रुपयांनी घसरण झाली आहे. सरकीच्या तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली असून अजूनही तसेच दर आहेत.

भाज्यांचे दर (किलो)

वांगी : २० रु.

टोमॅटो : ५ रु.

भेंडी : ३० रु.

दुधी : २० रु.

कारली :३० रु.

ढबू मिरची : २० रु.

गाजर : ३५ रु.

हिरवा वाटाणा : ४० रु

कोबी : १० रु. प्रतिनग

फ्लॉवर : १० रु. प्रतिनग

गवारी : ७० रु.

दोडका : ४० रु

काकडी : ४० रु.

बीन्स : ४० रु.

मेथी : ५ रु. पेंडी

पालक : ५ रु पेंडी

पोकळा : ५ रु. पेंडी

चाकवत : ५ रु. पेंडी

शेपू : ५ रु. पेंडी

कोथिंबीर : १० रु. पेंडी

ओली मिरची : २५ रु. किलो

कांदा : १२ रु.

बटाटा : २० रु.

लसूण : १४० रु.

आले : ४० रु.

शेवगा शेंग : १० रु. (३ नग)

तोंदली : ४० रु.

लिंबू : १० रु. (४ नग)

….

खाद्यतेल

सरकी : ८२ रु.

सूर्यफूल : ९० रु.

शेंगतेल : १४० रु.

….

फळांचे दर (किलो)

संत्री : ५० रु.

मोसंबी : ५० रु.

डाळिंब : ४० रु.

सफरचंद : ६० रु.

विदेशी सफरचंद : १२० रु.

केळी : ३५ रु. (डझन)

द्राक्षे : ३०० रु

बोर : ३० रु.

….

डाळींचे दर (किलो)

तूरडाळ : ११० रु.

मूगडाळ : ९० रु.

उडीद डाळ : १४० रु.

हरभरा डाळ : १४० रु.

मूग : ८० रु.

मसूर डाळ : ८० रु.

किराणा दर (किलो)

पोहे : ४० रु.

साखर : ३८ रु.

शेंगदाणा : ८५ ते ९० रु.

मैदा : २८ रु.

रवा : ३० रु.

शाबू : ६२ रु.

आटा : २८ रु.

ज्वारी : २६ ते ३५ रु

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *