facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / विहिरीत ऑइल मिश्रित पाणी

विहिरीत ऑइल मिश्रित पाणी

सतेचीवाडी येथील शेतकऱ्यांच्या विहिरी व ओढ्यात ऑइल मिश्रित पाणी आल्याने गावाची शेती उध्वस्त झाली असून जनावरांनाही हे खराब पाणी प्यावे लागत आहे. या त्रासामुळे आदिवासी शेतकरी स्थलांतर करण्याच्या विचारात असून येथील डांबर कंपनीला व तहसीलदारांना ग्रामसभेने वेळोवेळी ठराव देऊनही कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार कचेरीसमोर उपोषण करण्याचा इशारा
दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील डोळसने येथे असणाऱ्या कंपनीच्या डांबर व खडी प्लांटसाठी सतेचीवाडी येथील डोंगरावर मोठे खड्डे घेतल्यामुळे त्यातील डांबर ऑइल खाली झिरपल्याने विहिरी व ओढ्यातील पाणी ऑइल मिश्रित झाले आहे. तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात माती व दगडाचा चुरा आल्याने जमिन नापिक झाली आहे. तर जनावरांना व माणसांनाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आदिवासी ठाकर समाजाचे लोक मेटाकुटीला आले आहेत. गेली तीन वर्षांपासून डोळसने येथे मोंटो कार्लो कंपनीने पुणे नाशिक चौपदरीकरण काम सुरू केले असून त्यासाठी लागणारे डांबर व खडी प्लांट डोळसने येथील एका डोंगरावर सुरू केला आहे. त्याखालील दरीत हिवरगाव पठार असून त्याखाली सतेची वाडी आहे. तिथे ५०० लोकसंख्या असून गावात १० विहिरी, २ पाझर तलाव आहेत. ऑगष्ट महिन्यापासून विहिरीत व पाझर तलावात ऑइल मिश्रित पाणी आले असून आदिवासी ठाकर समाजाची जनावरे दगावली आहेत. माणसेही आजारी पडली आहेत. शेत जमिनीत वाळू व बारीक कच आल्याने जमिनही नापिक झाली आहे. त्यामुळे शेती उत्पन्न घटले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी ग्रामसभेचे ठराव देऊनही संबंधित कंपनीचे अधिकारी याबाबीकडे दुर्लक्ष्य करतात. याबाबत वृत्तपत्रात बातमी येताच जागे झालेल्या आरोग्य विभागाने गावाला भेट देऊन दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी आहेत. याबाबतचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *