facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘१०८’ अॅम्ब्युलन्स सेवा अॅपवरही

‘१०८’ अॅम्ब्युलन्स सेवा अॅपवरही

राज्याच्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्ह‌सिेसच्या ‘१०८’ या अॅम्ब्युलन्स सेवेसाठी आता मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत या अॅपवर एक क्लीक केल्यास दहा सेकंदांमध्ये अॅम्ब्युलन्स सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जाऊन काही वेळातच अॅम्ब्युलन्स घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होणार आहे.

२६ जानेवारी २०१६ रोजी ही मोफत ‘१०८’ क्रमांकाची अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. या हेल्पलाइनवर फोन केल्यास काही वेळातच डॉक्टरसहित सुसज्ज अॅम्ब्युलन्स घटनास्थळी येते. आतापर्यंत या सेवेमुळे बारा लाख जणांचे प्राण वाचले आहेत. रस्ते अपघातापासून हार्ट अॅटॅक, प्रसूती, इमारत दुर्घटना, स्फोट अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत ‘१०८’ अॅम्ब्युलन्स सेवा धावून जाते.

असे काम करणार अॅप

■ गुगल प्ले स्टोअरवरून कोणत्याही अँड्रॉइड मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करता येईल.

■ त्यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव, ई-मेल, मोबाइल क्रमांक, वय आदी तपशील सादर करावा लागेल.

■ रुग्णाला कोणत्या स्वरूपाची वैद्यकीय मदत हवी त्याचा ‘ऑप्शन’ मोबाइल स्क्रीनवर येणार.

■ त्यावर क्लीक केल्यास दहा सेकंदात मदतीचा संदेश हेल्पलाइनवर जाणार.

■ ही सेवा जीपीआरएसव्दारे जोडली असल्याने वैद्यकीय मदत मागणारी व्यक्ती कोणत्या भागात आहे त्याची माहिती मिळेल. त्याआधारावर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचणार.

■ हे अॅप डाऊनलोड केलेल्या व्यक्तीला जवळच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे संपर्क क्रमांकही या सेवेकडे नोंदवण्याची सोय आहे.

■ आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या नातेवाईकांनाही माहिती देण्याची सोय यामध्ये आहे.

या अॅम्ब्युलन्ससाठी फोन करणाऱ्या व्यक्तींना बहुतेकवेळा घटनास्थळाचा नेमका पत्ता सांगता येत नाही. त्यामुळे ते ठिकाण शोधण्यात वेळ जातो. पण अॅपमुळे ठिकाणाची अचूक माहिती मिळते.

– डॉ. ज्ञानेश्वर शेळके, चीफ ऑपरेशन मॅनेजर, इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स सेवा

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *