facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / ​नाताळच्या उत्साहाला उधाण

​नाताळच्या उत्साहाला उधाण

नाताळसाठी जळगाव नगरी सजली आहे. सांताक्लॉजची वेशभुषा व विविध भेटवस्तूंनी भरलेली दुकाने ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. चर्चमध्ये सजावटीची कामे पूर्ण झाली असून, भगवान येशूच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम होणार आहे.

पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्च, रामानंदनगर रस्त्यावरील सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च, मेहरूणचे सेंट थॉमस चर्चमध्ये सजावट करण्यात आली आहे. येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून नाताळ साजरा केला जात असून, आज रविवारी या सणानिमित्त ख्रिस्तीबांधव एकमेकांना शुभेच्छा देणार आहेत. यादिवशी ख्रिसमस कॅरलचे आयोजन करण्यात आले आहे. पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्‍ये गुरुवारपासून कार्यक्रमांना सुरवात झाली. २५ रोजी सकाळी ९.३० वाजता नाताळ उपासना होईल. वक्ते शशिकांत वळवी आहेत. २९ रोजी दुपारी ३ वाजता संडे स्कूल, ३० रोजी संध्याकाळी ७ वाजता महिला मंडळ कार्यक्रम, ३१ रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत उपकार स्तुती, साक्ष प्रार्थनेद्वारे वर्षाची सांगता होणार आहे. रविवार, १ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता नूतन वर्ष उपासना होणार आहे. सेंट थॉमस चर्चमध्ये येशूच्या जन्मावर देखावा करण्यात आला असल्याचे फादर बिजू यांनी सांगितले. रविवार, २५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान चर्च सर्वांसाठी खुले आहे. ख्रिसमसनिमित्त इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शनिवार, २४ डिसेंबरपासून सुटी लागली आहे. १ जानेवारीपर्यंत नाताळची सुटी असणार आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *