facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / उद्याची टायपिंग परीक्षा वांध्यात

उद्याची टायपिंग परीक्षा वांध्यात

टायपिंग परीक्षेची माहिती ऐनवेळी दिल्याचा दावा कम्प्युटर संस्थाचालकांनी केला आहे. त्यामुळे मंगळवार, २७ डिसेंबरला होणारी ऑनलाइन टायपिंग परीक्षा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. पारंपरिक टायपिंगची ‘टकटक’ बंद करण्याचे स्वप्न बघणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे धोरण कुचकामी असल्याचे दिसून येत आहे. आठ महिन्यांपूर्वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन टायपिंग परीक्षा घेण्यात येणार आहे.

तीन दिवसांपूर्वी संस्थांकडे परीक्षेचे प्रात्यक्षिक पाठविण्यात आले. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना आता नियोजन कसे करायचे, असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. या परीक्षेवर शासकीय संस्थाचालकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. गाजावाजा करून तंत्रज्ञानावर भर देत विद्यार्थी घडविण्याचा बेत आखणारी राज्य परीक्षा परिषद तोंडघशी पडली आहे. याला सर्वस्व परीक्षा परिषदेचे धोरण असल्याचा दावा अनेक संस्थाचालकांनी केला आहे.

ही परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि लातूर या आठ केंद्रांवर घेण्यात येईल. आधी जिल्हास्तरावर ही परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, अचानक विभागस्तरावर ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ खर्च होणार आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची वेळ सायंकाळी असल्यास त्याला परत गावी जाणे शक्य होणार नाही. विभागास्तरावर होणारी ही परीक्षा जिल्हास्तरावर व्हावी, अशी मागणी संस्थाचालकांनी केली आहे. ऑनलाइन टायपिंग परीक्षेत विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब सुखद धक्का देणारी आहे. पण, सरकारने जाणीवपूर्वक वेळेवर या परीक्षेची माहिती दिली. ऑनलाइन टायपिंग सरकारलाच नको, असा दावा
संस्थाचालकांनी केला.

–अध्यक्ष, आयुक्तांची मनमानी
टायपिंगसाठी विद्यार्थ्यांकडून ४ हजार ७०० रुपये घेण्यात आले. दोन वर्षांपासून विद्यार्थी टायपिंगचा सराव करीत आहेत. आता परीक्षा परिषदेने नवा नियम लागू केला. अचानक नियमात बदल करण्यात आला आहे. यासाठी परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि आयुक्त सुखदेव डेरे जबाबदार असल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला आहे. नेहमी ऑनलाइन टायपिंगला वाव देण्यासाठी तत्पर असणाऱ्या परिषदेने तडकाफडकी कसा निर्णय घेतला, असा आरोप केला आहे. सोबतच वैकल्पिक प्रश्न ऑनलाइनमध्ये नको, यावरही संस्थाचालकांनी आक्षेप घेतला आहे.

–निवडणुकांमुळे वेळापत्रकात बदल
नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात ८ जानेवारी रोजी नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे टंकलेखन-लघुलेखन परीक्षेत बदल करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील परीक्षा १३ जानेवारीला घेण्यात येतील.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *