facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / डोंगरगाव येथे भीषण अपघात; चार ठार

डोंगरगाव येथे भीषण अपघात; चार ठार

नागपूर, वर्धा मार्गावरील डोंगरगाव भागात रविवारी झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कार हवेत उडाली व उलटली. कारचे इंजिन तब्बल २० फूट दूर फेकल्या गेले. यावरून या अपघाताची कल्पना येते. अपघातामुळे वर्धा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. विशुपती शंकर पटेल ( वय ३० रा. भोपाळ), आनंद रामसिंग पारधी (२३ रा. ह‌ुडकेश्वर), चंद्रशेखर ऊर्फ बंटी चव्हाण (वय २४ रा. खापरी) व रवी रहांगडाले (२५), अशी मृतकांची नावे आहेत.

रविवारी दुपारी चौघेही एमएच-४९-एफ-०९५२ या क्रमांकाच्या कारने पेट्रोल भरून नागपूरकडे येत होते. डोंगरगाव भागात कारचा टायर फुटला व कार रस्तादुभाजकावरून उसळून पलीकडे गेली. याचवेळी नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या एमएच-४९-९१९२ या क्रमांकाच्या ट्रेलरवर कार आदळून पुन्हा डावीकडे आली व उलटली. ट्रेलरही उलटला. यात घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मृतदेह कारमध्येच फसले होते.पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. ट्रेलरचालक राकेश बालाजी शंभरकर याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पेट्रोल भरायला गेले ते कायमचे

आनंद याचा चुलत भाऊ राजेश बोपचे यांच्या मालकीची ही कार आहे. कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी आनंद यांना कार दिली होती. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आनंद व अन्य तिघे पेट्रोल टाकण्यासाठी डोंगरगाव भागात गेले होते. पेट्रोल भरून नागपूरकडे येताना भीषण अपघात झाला अन चौघेही गेले ते कायमचे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *