facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / पोलिसांची झोप उडाली

पोलिसांची झोप उडाली

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शुक्रवारी पोलिसांचेच वाहन जाळल्याच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस विभाग अखेर जागा झाला असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक कार्यालयात विविध उपाययोजना सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

धुळे शहरातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभे असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक देवीदास शेळके यांचे टाटा सुमो वाहन (एमएच १८ एफ ०१६२) मनोरुग्ण असलेल्या मनीष भोरसकर यांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेमुळे जिल्ह्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलिस प्रशासनाचे मुख्य कार्यालयच सुरक्षित नसल्याची बाब समोर आली. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि कार्यालय सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यास आल्या आहेत. त्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक देवीदास गवळी यांच्यावर सोपविली आहे.

पोलीस अधीक्षक हतबल

धुळे जिल्हा तीन राष्ट्रीय महामार्गावर असल्याने जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अवैध व्यवसायांचे जाळे पसरले आहे. दुसरीकडे शिरपूर शहरात भरदिवसा सेंट्रल बँक ऑफ इंडियामधे दरोडा टाकून दहा लाख रुपये लुटून नेण्यात आले. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक आता हतबल झाले असून, नेमका आता कोणावर विश्वास ठेवावा अशी शंका पोलिस अधीक्षकांना असल्याचे सूत्राकंडून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचारी नेमकी काय कामगिरी बजावतात याचा अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टर बसविण्यात आले. तसेच परिसरात असलेल्या शहर पोलिस ठाणे व वाहतूक पोलिस कार्यालयाभोवताली संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मनोरुग्ण ठाण्याला

पोलिसांचे वाहन जाळणारा मनोरुग्ण मनीष भोरसकर याला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तो मानसिकदृष्टया आजारी असल्याचे त्याचे नातवाईकांनी नाशिक, पुणे, मुंबई येथील वैद्यकीय अहवालांचे दाखले देत सांगितले. न्यायालयाने मनोरुग्ण भोरसकर याची पुढील उपाचारासाठी ठाणे येथील मनोरुग्णालयात रवानगी करण्याचे आदेश दिले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *