facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / मुंबई / माथेरानची राणी पुन्हा धावणार!

माथेरानची राणी पुन्हा धावणार!

माथेरानमधील प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली टॉय ट्रेन बंद असल्याने पर्यटक आ​णि स्थानिकांमध्ये नाराजी आहे. विविध कारणांमुळे तात्पुरता विराम देण्यात आलेली टॉय ट्रेन लवकरच सेवेत आणण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने नेरळ ते माथेरान मार्गासाठी मागवलेली एअर ब्रेक व्यवस्था असणारी तीन इंजिन नेरळमध्ये दाखल झाली आहेत. त्याचप्रमाणे इथल्या रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी रेल्वेतर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणारी माथेरान टॉय ट्रेन पावसाळ्यापूर्वी विविध कारणांमुळे सेवेतून बाहेर काढण्यात आली. ही ट्रेन रुळांवरून घसरल्याने सावधगिरीचा भाग म्हणून ही रेल्वेसेवा तात्पुरत्या स्तरावर बंद करण्यात आली आहे. मे महिन्यातील दोन अपघातांनंतर त्यात आवश्यक ते बदल करण्याशिवाय सेवा न चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सेवा पूर्ववत चालवण्यासाठी एअर ब्रेकची व्यवस्था असणारे इंजिन आणण्यासह रुळांच्या दुरुस्तीचाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी मध्य रेल्वेने एअर ब्रेकची व्यवस्था असणारी तीन इंजिन आणली आहेत. ही इंजिन नेरळ येथील कार्यशाळेत दाखल झाली आहेत. तत्पूर्वी या पद्धतीच्या दोन प्रारुप इंजिनांच्या सहाय्याने चाचण्याही घेतल्याचे समजते.

रुळांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी नुकतीच केली. या सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेरळ ते माथेरान मार्गावर रुळांसाठी खडी नेणे हे एक मोठे आव्हान रेल्वेसमोर आहे. ते पेलून अनंत अडचणींतून मार्ग काढण्याचे काम नेटाने सुरू आहे.

संरक्षक भिंतीचे काय?

नेरळ ते माथेरान दरम्यान ६०० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच सेवा कार्यान्वित होणार असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, नवीन इंजिन आल्याने आणि रेल्वे रुळांचे काम सुरू असल्याने माथेरानवासियांना ही सेवा लवकर सुरू होण्याचा​ विश्वास वाटत आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *