facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / ‘मूड इंडिगो फेस्ट’मध्ये गाजले दळवीज्

‘मूड इंडिगो फेस्ट’मध्ये गाजले दळवीज्

आशिया खंडातील सर्वात मोठा सांस्कृतिक कलाउत्सव म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील ‘मूड इंडिगो’ फेस्टिव्हल यंदा कोल्हापुरातील दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी गाजवले. मूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये दळवीज्च्या माजी विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे स्ट्रिट ३ डी पेटिंग साकारले आहे. सध्याचा सर्वांचा चर्चेचा विषय असलेल्या ‘नोटाबंदी व एटीएम’ या विषयावर हे पेंटिंग आधारित आहे.

‘मूड इंडिगो’ फेस्टिव्हलमध्ये भारतातून सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतात. युवा पिढीचे आकर्षण ठरणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाटक, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म, डान्स यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. फेस्टिव्हलचा कॅम्पस चित्रमय करण्यासाठी भारतातील चित्रकारांबरोबरच भारताबाहेरील चित्रकारही बोलावले जातात. परदेशात सर्वात जास्त पहायला मिळणारे ३ डि स्ट्रिट पेटिंग यावर्षी मुंबईतील आयआयटी पवईमधील या फेस्टिव्हलमध्ये पहायला मिळाले. विशेष म्हणजे हे पेंटिंग भारतातील सर्वात मोठे ३ डी स्ट्रिट पेंटिंग ठरलयं. हे पेंटिंग रेखाटलय कोल्हापुरातील दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी.

संग्राम चव्हाण, पियुष सुतार, राहुल सुतार, योगेश साटम, शिवकुमार केसरकर यांनी हे भव्य पेंटिंग साकारले आहे. पेंटिंग सुमारे १२० फूट लांबीचे आणि ३६ फूट रुंदीचे आहे. यासाठी त्यांनी

जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली. सकल सपाट पृष्ठभागावरील हे पेंटिंग चित्र त्रिमितीचा आभास देते. लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये याची नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *