facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नागपूर / मेयोतील जागांमध्ये कपात

मेयोतील जागांमध्ये कपात

राज्यात खासगी नर्सिंग स्कूलचे पेव फुटले आहे. खासगीला प्रशिक्षणार्थी मिळत नसल्यामुळे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेयो) संलग्न असलेल्या जनरल नर्सिंग स्कूलच्या जागा कमी करण्याचे षडयंत्र खुद्द वैद्यकीय संचालक कार्यालयातून राबवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्यात १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या जनरल नर्सिंग स्कूल एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे इंडियन नर्सिंग कौन्सिलचे निर्देश होते. परंतु वैद्यकीय संचालक कार्यालयाने प्रवेश प्रक्रियाच उशिरा सुरू केली. जूनमध्ये दरवर्षी नर्सिंग स्कूलचे सत्र सुरू होते. परंतु, यावर्षी ते ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्याचे निर्देश दिले गेले. प्रवेशाचा घोळ करण्यामागेही खासगी नर्सिंग स्कूलचे कारण कारणीभूत ठरत असल्याचे आता बोलले जात आहे.

राज्यात मुंबईत सेन्ट जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय, नागपुरात इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अंबेजोगई, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मिरज, कोल्हापूर, लातूर, धुळे येथे जनरल नर्सिंग स्कूल आहेत. या जनरल नर्सिंग स्कूलमध्ये सरकारने आवश्‍यक पदनिर्मिती केली नसल्याने भारतीय परिचर्या परिषदेने पाहणीत त्रुटी नोंदविल्या आहेत.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ नये म्हणून दरवर्षी सरकार त्रुटी दूर करते. मात्र नर्सिंगला यातून डावलले जाते. नर्सिंगच्या तीनवर्षीय अभ्यासक्रमात १२ सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये १४०० प्रशिक्षणार्थी परिचर्या प्रशिक्षण घेतात. मात्र, जीएनएम स्कूलच्या विकासाचे धोरण राबवले जात नाही. मेयोशी संलग्न जीएनएम स्कूलमध्ये कधीकाळी अडीचशे प्रशिक्षणार्थी परिचर्या अभ्यासक्रम शिकत होते. सध्या ही प्रवेशमर्यादा जेमतेम २० जागांवर आली आहे. विदर्भातील या संस्थेतील परिचर्या प्रशिक्षणार्थींच्या संख्येत दिवसेदिवस वाढ करण्याऐवजी कपात केली जात आहे, हे षडयंत्र असल्याचा आरोप विदर्भ वैद्यकीय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी केला आहे. यासंदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *