facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / मोबाइल व्हॅन देणार पीकविम्याची माहिती

मोबाइल व्हॅन देणार पीकविम्याची माहिती

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – सरकारच्या पीकविमा योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. रब्बी हंगामातही ही योजना सुरू असून योजनेची माहिती मोबाइल व्हॅनद्वारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या दोन मोबाइल व्हॅन जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावे, वाड्या-वस्त्यांवर फिरून योजनेची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्ह्यात रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या पिकांना प्रतिकूल हवामान घटकांपासून विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेची शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, तसेच त्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढवला जाणार आहे. यासाठी मोबाइल व्हॅनच्या मदतीने गावागावात फिरून योजनेची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व मोठ्या लोकवस्तीच्या गावात आठवडाभरात व्हॅन फिरणार आहे. या उपक्रमास शनिवारपासून सुरुवात झाली असून ३० डिसेंबरपर्यंत उपक्रम सुरू राहणार आहे. या योजनेत गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, करडई, सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कांदा या पिकांचा समावेश आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. तसेच, उन्हाळी भुईमूग पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ आहे. मोबाइल व्हॅनद्वारे या सर्व बाबींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *