facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / पुणे / ६३ हजार कैद्यांची ‘व्हीसी’ हजेरी

६३ हजार कैद्यांची ‘व्हीसी’ हजेरी

मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी राज्यातील तुरुंग आणि कोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) जोडण्यात आले आहेत.त्यानंतर कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१५मध्ये ६३ हजार कैद्यांना कोर्टासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होण्यात मदत झाली आहे.

राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, २९ जिल्हा आणि अकरा खुले तुरुंग, एक महिला तुरुंग, खुली कॉलनी, वसाहत असे एकूण ५४ तुरुंग आहेत. राज्यातील तुरुंगामध्ये २९ हजार ८०६ कैदी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये २१ हजार ५२१ कैदी हे न्यायालयीन आहेत. त्यामुळे त्यांना तारखांना कोर्टात हजर करावे लागते. कोर्टात हजर करण्यासाठी त्यांना मोठे मनुष्यबळ लागते, तसेच काही वेळेला कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी, तसेच मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी राज्यातील जिल्हा कोर्ट आणि तुरुंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडण्यात आले. त्यानुसार कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यास सुरुवात झाली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू केल्यानंतर २०१४मध्ये ६३ हजार ७२६ कैद्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. २०१३मध्ये हा अकडा ४० हजारांवर होता. त्यामध्ये पुढील वर्षी २३ हजारांनी वाढ झाली. २०१५मध्येही ६३ हजार कैद्यांना विविध कोर्टांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले आहे. राज्यात ठाणे तुरुंगातून १७ हजार ७१३ कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर (९,००६), मुंबई (५,८४८), औरंगाबाद (४,८४१), चंद्रपूर जिल्हा तुरुंग (४,५३७) आणि येरवडा (३,९८०) कैद्यांना हजर करण्यात आले आहे.

येरवड्यात ‘व्हीसी’चा वापर कमी

राज्यात सर्वांत मोठे येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे. या तुरुंगात राज्यात सर्वाधिक ४ हजार १२९ कैदी आहेत. ठाणे, नागपूर, मुंबई मध्यवर्ती तुरुंगातून कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, येरवडा तुरुंगातून कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. येरवडा तुरुंगात पहिल्यांदा ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पण, त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *