facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नागपूर / कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा मार्ग मोकळा

कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा मार्ग मोकळा

शहरातून लाखो टन निघणाऱ्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे व त्यापासून वीजनिर्मिती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प महापालिकेने आखला आहे. या प्रकल्पाकरता ३०८ कोटींचा खर्च अपेक्षित असून या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यासाठी एस्सेल इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड आणि हिटाची झोनसेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीच्या संयुक्त उपक्रमातून आलेल्या निविदेस मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी जमीन व इतर मान्यता घ्यावी लागणार असल्याने हा प्रस्ताव आता महासभेपुढे येणार आहे.

शहरातून दररोज सुमारे १ हजार ते ११०० मेट्रीक टन कचरा संकलित केला जातो. शहराचा वाढता पसारा बघता निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने आता दररोज सुमारे ८०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती योजना आखली आहे. सध्या केवळ १५० ते २०० मेट्रीक टन घनकचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात येत आहे. महापालिकेकडून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा देण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया शुल्काचे दर निश्चित होत नसल्याने अनेक दिवसांपासून रखडला होता. मात्र, २२५ रुपये प्रति मेट्रीक टनप्रमाणे कंपनीला प्रक्रिया शुल्क देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेकडून व्यवहार्यता निधी म्हणून कंपनीला ७० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने हिरवी झेंडी दिल्याने आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पालाच्या उभारणीला २०१७ वर्षाच्या मार्च महिन्यापासून सुरूवात होणे अपेक्षित असून २०१९ पर्यंत हा पूर्णपणे कार्यान्वित होईल अशी ग्वाही स्थायी समिती सभापती बंडू राऊत यांनी दिली. विशेष म्हणजे भांडेवाडीच्या डंम्पिग यार्डची कमी होत चाललेली क्षमता व पर्यावरणाचा विचार करता महापालिकेकडून इतर उपाययोजना करण्यात येत आहे. याठिकाणी १९६७ पासून कचरा टाकण्यात येत असून सुमारे ६ लाख मेट्रीक टन कचरा आतापर्यंत डम्प करण्यात आला आहे. हा कचरा वेगळा करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करणार आहे.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *