facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / कार्ड स्वाइप करून काढा लोकल पास

कार्ड स्वाइप करून काढा लोकल पास

नोटाबंदीमुळे सुट्ट्या पैशांची होणारी चणचण लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ​अनारक्षित तिकीट केंद्रावर स्वाइप कार्डच्या आधारे पास देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. नव्या वर्षात पासधारकांना डेबिट/क्रेडिट कार्डच्या साह्याने पास काढणे सोपे ठरणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर रेल्वे प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी सर्वप्रथम लांबपल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना स्वाइप कार्डच्या आधारे तिकीट उपलब्ध करण्यासाठी तिकीट केंद्रावर मशिन पुरवण्यात आली. त्यानंतर उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी अशी मशिन पुरवण्यासाठी तयारी करण्यात आली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पास मिळण्यासाठी स्वाइप कार्डचा वापर करता येणार आहे. परंतु सध्या तरी लोकल प्रवासातील तिकिटांसाठी त्याचा उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

किती ठिकाणी मशिन…

मध्य रेल्वेवरील ६२४ आणि पश्चिम रेल्वेवरील ३२४ तिकीट खिडक्यांवर ही मशिन बसवण्यात येणार आहेत. ही मशिन बसवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सुविधेमुळे प्रवाशांना रांगेत तिष्ठत राहण्याची आवश्यकता भासणार नाही, असाही दावा करण्यात येत आहे.

सुट्ट्या पैशांच्या चणचणीचे काय?

पासधारकांना मशिनचा फायदा होणार असला तरी प्रवाशांना भेडसावणाऱ्या सुट्ट्या पैशांच्या चणचणीवर उपाय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेने प्रयत्न करायला हवेत, अशी मागणीही केली जात आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *