facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / नव्या वर्षाची सुरुवात एक सेकंद विलंबाने

नव्या वर्षाची सुरुवात एक सेकंद विलंबाने

नववर्ष काहीसे विलंबाने म्हणजे एक सेकंद उशिराने दाखल होणार आहे. पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ही माहिती दिली. ३१ डिसेंबर २०१६ला लीप सेकंद गृहित धरले जाणार असल्याने रात्री १२ वाजता लगेचच नवे वर्ष सुरू होणार नाही.

पृथ्वीचा वेग मंदावत आहे. घड्याळे अधिक अचूक असल्याने त्यातील फरक दूर करण्यासाठी लीप सेकंद गृहित धरण्यात येते, असे सोमण म्हणाले. यापूर्वी ३० जून २०१५ला लीप सेकंद गृहित धरण्यात आले होते. १९७२ पासून आत्तापर्यंत एकूण २६ वेळा असे लीप सेकंद गृहीत धरण्यात आले आहे.

२०१७ची वैशिष्ट्ये

– हे वर्ष रविवारने सुरू होत आहे. यापूर्वी २०१२ हे वर्ष रविवारने सुरू झाले होते. २०२३ हे वर्षही रविवारने सुरू होणार आहे.
– २००६ चे आणि २०१७ चे कॅलेंडर सारखे असेल.
– २०१७ मध्ये गुढीपाडवा हा सण फाल्गुन अमावास्येच्याच दिवशी २८ मार्चला येत आहे. या आधी २००८मध्ये असे घडले होते. आता २०२६ मध्येही गुढीपाडवा फाल्गुन अमावास्येच्याच दिवशी येईल.
– २०१७ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे असून शुक्रवार १० फेब्रुवारीचे छायाकल्प चंद्रग्रहण आणि सोमवार ७ ऑगस्टचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल.
– २६ फेब्रुवारीचे कंकणाकृती सूर्यग्रहण आणि २१ ऑगस्टचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
– यंदा १२ जानेवारी, ९ फेब्रुवारी, ९ मार्च, ९ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर असे पाच गुरुपुष्य योग आहेत.
– आगामी वर्षात तीन अंगारकी चतुर्थी येतील. १४ फेब्रुवारी, १३ जून आणि ७ नोव्हेंबर.
– २०१७ मध्ये भरपूर विवाह मुहूर्त आहेत.
– जानेवारीत ७, फेब्रुवारीत १२ , मार्चमध्ये ९, एप्रिलमध्ये ४, मे मध्ये १४, जूनमध्ये १५, जुलैमध्ये ३, नोव्हेंबरमध्ये ५ , डिसेंबरमध्ये ५ विवाह मुहूर्त आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये विवाहमुहूर्त नाहीत.
– तारखेप्रमाणे दरवर्षी रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. २०१७ मध्ये ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी ७ जूनला येत आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा ६ व ७ जून असा दोन दिवस असेल.
– शुक्र ग्रह सूर्यतेजामध्ये लुप्त झाल्यामुळे २२ मार्च ते २६ मार्च आणि १६ डिसेंबर ते १ फेब्रुवारी २०१८पर्यंत दिसणार नाही.
– २०१७ मध्ये सर्व सण २०१६ या वर्षापेक्षा सुमारे ११ दिवस लवकर येतील.
– २०१८ मध्ये ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने ते उशीरा येतील.
– २०१७ मध्ये सुट्ट्यांची चंगळ असेल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी ), महावीर जयंती (९एप्रिल) , मोहरम ( १ ऑक्टोबर) या तीनच सुट्ट्या रविवारी येत आहेत. उरलेल्या २१ सुट्ट्या या इतर वारी येत आहेत. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालयीन सुट्टी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी, मार्च, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये सलग तीन दिवस सुट्टी मिळेल.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *