facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / नाशिकच्या यकृताने पुणेकराला जीवदान

नाशिकच्या यकृताने पुणेकराला जीवदान

नाशिकच्या एकोणीस वर्षीय ब्रेनडेड युवकाचे यकृत रुबी हॉस्पिटलमधील अडतीस वर्षीय व्यक्तीला मिळाल्याने त्यांना जीवदान देण्यात यश आले आहे. शहरातील हे ५९वे यकृतदान ठरले आहे. ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून नाशिक ते पुणे हे अंतर अवघ्या सव्वातीन तासात पूर्ण करणे शक्य झाले.

‘नाशिक येथे राहणारा युवक पट्टीचा मोटारसायकलस्वार होता. नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे दुचाकीवरून पडून त्याचा २४ डिसेंबरला अपघात झाला होता. त्यात तो ब्रेनडेड झाला. त्यानंतर त्याचे अवयवदान करण्यासाठी नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. अनेक प्रयत्नानंतर नातेवाइकांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचे अवयव काढण्यात आले. दोन मूत्रपिंडे, यकृत आणि दोन डोळे आदी दान करण्यात आले. त्यापैकी यकृत पुण्यातील रुबी हॉस्पिटलला दान करण्यात आले’, ’अशी माहिती नाशिकचे ट्रान्सप्लांट समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी दिली. उर्वरित अवयव नाशिकच्या हॉस्पिटलमधील प्रतीक्षा यादीतील पेशंटना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘हॉस्पिटलमध्ये ३८ वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतीक्षेत होती. नाशिकच्या युवकाचे यकृत मिळाल्याने त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रत्यारोपण करण्यात आले. नाशिकहून सकाळी पावणेनऊला यकृत घेऊन अॅम्ब्युलन्स ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुण्यात ११ वाजून ५७ मिनिटांनी पोहोचली. नाशिक ते पुणे हे अंतर अवघ्या तीन तास १० मिनिटांत पार करण्यात यश आले. पुण्यातील हे ५९ वे यकृतदान ठरले आहे,’ अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जोशी यांनी दिली. रुबी हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनीष वर्मा, डॉ. कमलेश बोकील यांच्या पथकाने प्रत्यारोपण केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *