facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नागपूर / पुन्हा एकदा उठल्या ‘जय’च्या वावड्या

पुन्हा एकदा उठल्या ‘जय’च्या वावड्या

एप्रिल महिन्यापासून बेपत्ता असलेला जय वाघ आदिलाबाद येथे आढळल्याच्या अफवेने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक वृत्तवाहिनीच्या बातमीचा हवाला देत जय सापडल्याची चर्चेने सोमवारी जोर धरला होता. मात्र, आदिलाबाद येथे आढळलेला वाघ हा जय नसून, कावल व्याघ्रप्रकल्पातील टी-२ या नावाने ओळखला जाणारा वाघ असल्याची माहिती मिळाली आहे.

उमरेड-कऱ्हांडला येथून निघून गेलेला जय नेमका कुठे गेला असेल, याविषयी आजवर अनेक अफवा उडाल्या आहेत. सात फुटांपेक्षा जास्त लांबीचा हा वाघ तेलंगण येथील आदिलाबादच्या जवळील जंगलात आढळल्याचे वृत्त धडकले. स्थानिक वृत्त वाहिनीने प्रसृत केलेला व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या झपाट्याने पसरला. यामध्ये जयसारख्या दिसणाऱ्या वाघाची दृश्ये दाखवून जयचा ‌ठावठिकाणा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ १० डिसेंबरच्या सुमारास घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वनविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जय वाघाची ही दृश्ये उमरेड-कऱ्हांडलामधील आहेत. आदिलाबादजवळील जंगलातही सध्या मोठा वाघ दिसत असला तरी तो जय नाही. तेलंगणमधील कावल व्याघ्रप्रकल्पातील कदम रेंजमध्ये वास्तव्यास असलेला हा वाघ टी-२ या नावाने ओळखला जातो आहे. हा वाघदेखील महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्यातून आला आहे मात्र तो निश्चितपणे जय नाही, अशी माहिती वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन सोसायटीचे वरिष्ठ रिसर्च बायोलॉजिस्ट आणि आदिलाबाद येथील वन्यजीव कार्यकर्ते इमरान सिद्दिकी यांनी दिली.

महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांनीदेखील जयबाबत कोणतीही विश्वासार्ह माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *