facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / भुसावळ नगरपालिकेसाठी स्वतंत्र बंधाऱ्याचा प्रस्ताव

भुसावळ नगरपालिकेसाठी स्वतंत्र बंधाऱ्याचा प्रस्ताव

 

जळगाव – अमृत योजनेतील भुसावळच्या सहभागाबाबत सोमवारी नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ पालिकेचा स्वतंत्र बंधारा असल्यास देखभाल व दुरूस्ती सुलभ होईल, असे सुचविले आहे.

अमृत योजनेत भुसावळ नगरपालिकेचा समावेश झालेला आहे. ६०० कोटी रुपयांची ही योजना आहे. याबाबत सोमवारी मुंबईत बैठक झाली. त्यात शासनातर्फे पिंप्रीसेकम व हतनूर धरणातून पाणी घेण्याचे सुचविण्यात आले. आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दोन्ही ठिकाणांहून पाणी घेतल्यास ते खर्चिक व देखभालीसाठी जटील असल्याचे सांगितले. त्याऐवजी नगरपालिकेचा स्वतंत्र बंधारा बांधला गेल्यास त्यातूनच ४० एमएलडी पाणी घेता येईल. देखभाल खर्चसुद्धा कमी लागेल, नवीन बंधाऱ्यामुळे तापीपात्रात मुबलक पाणी साठेल. त्याचा उपयोग नदी किनाऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी करता येऊ शकतो, असा प्रस्ताव आमदार संजय सावकारे यांनी बैठकीत सुचविला. या प्रस्तावाची छाननी होणार आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *