facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नाशिक / यावे, पक्षात स्वागतच आहे!

यावे, पक्षात स्वागतच आहे!

राजकारणात शब्दाला नाही तर परिस्थितीला किंमत असते. परिस्थितीनुरूप जसे निर्णय घेता येईल, तसे घ्यावे लागतात. याचा सर्वांत मोठा अनुभव आजमितीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेत आहेत. २०१२ मध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांची परीक्षा घेऊन उमेदवारी देणारे ठाकरे आज गंभीर गुन्हे नावावर असलेल्या योगेश शेवरेला आवताण देत आहेत. या पक्षात आपले स्वागतच आहे, अशी राज ठाकरे यांची भूमिका थोडीफार आशा असलेल्या मतदारांना रूचणार काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेला १२२ उमेदवार मिळवताना नाकी नऊ येण्याची शक्यता आहे. फक्त आऊटगोईंग सुरू असलेल्या मनसेत आज कोणी प्रवेश करणार म्हटले तर पदाधिकाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मग, त्याच्यावर खून, दरोडे, हाणामारी असे गुन्हे दाखल असले तरी बेहत्तर!

सातपूरमधील कुख्यात गुंड योगेश शेवरे याच कलाने जाणारा. काही दिवसांपूर्वी त्याने मनसेत प्रवेश केला. प्रवेश सोहळा पार पडताच पोलिसांनी शेवरेची उचलबांगडी करीत पोलिस स्टेशनला आणले. याच शेवरेने आज प्रथमच पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरेंची भेट घेतली. उच्च शिक्षितांच्या पक्षात शेवरेलाही स्थान मिळाल्याचा ‘आनंद’ या भेटीत मात्र दिसून आला.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *