facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / शिर्डीत तरुणाचा गोळीबारात मृत्यू

शिर्डीत तरुणाचा गोळीबारात मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क – 

अहमदनगर – शिर्डीःशिर्डीत मोबाइल चोरीच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. नगर-मनमाड रस्त्यावर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर रविवारी रात्री ही घटना घडली.

किसन बागूल (वय २५) असे गोळीबारात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शासकीय विश्रामगृहाजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोबाइल चोरीच्या वादातून गोविंद त्रिभुवन, राहुल पवार, शंकर स्वामी, कुणाल चौधरी यांच्यात भांडणे झाली. ते सोडविण्यासाठी किसन बागूल गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. नंतर त्याच्या पोटात गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. त्यात किसनचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुणाल चौधरी या तरुणास ताब्यात घेतले आहे.

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *