facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / उसने पैसे मागितल्याने दूधवाल्याकडून खून

उसने पैसे मागितल्याने दूधवाल्याकडून खून

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने दूधवाल्याने महिलेला पळवून नेऊन तिचा खून केल्याचा प्रकार हडपसर येथे उघडकीस आला आहे. महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून तपास करून, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खून करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

कमल वसंत शिंदे (वय ५५, रा. हिंगणे चाळ, ससाणेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संतोष किसन हंडगर (वय ३०, रा. हडपसर) याला अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचे पती लष्करात होते. त्यांचे निधन झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. आरोपी हंडगर याचा दूध टाकण्याचा व्यवसाय आहे. महिलेच्या घरी दूध टाकण्यासाटी जात असल्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने शिंदे यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. मात्र, ते देण्यासाठी त्या तगादा लावत असल्याने हंडगर याने पैसे परत देत असल्याचे सांगून त्यांना बाहेर नेले. ही घटना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. कमल शिंदे यांच्या भाचीने त्या हरवल्याची तक्रार हडपसर पोलिसांकडे नोंदविली होती.

समाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, कर्मचारी कर्मचारी अविनाश मराठे, गणेश जगताप, प्रमोद म्हेत्रे, नितीन तेलंगे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्या वेळी हंडगर याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याचे आढळून आले. हंडगर याने कमल शिंदे यांच्याकडून ४० हजार रुपये आणि त्याच्या मित्राने ९० हजार रुपये घेतले होते. हे पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्यांना बाहेर नेले आणि कुऱ्हाडीने वार करून हंडगरने त्यांचा खून केला.
कोर्टाने त्याला २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *