facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / चलता है, खपवून घेणार नाही!

चलता है, खपवून घेणार नाही!

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – पोलिस अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. पोलिस स्टेशनमधील कामांत त्यांचे लक्ष नसल्याच्या अनेकदा तक्रारी आल्या. अदखलपात्र गुन्ह्यांबाबतही पोलिस निरीक्षकांना माहिती नसते. पोलिस स्टेशनअंतर्गत होणाऱ्या प्रत्येक बाबीची माहिती पोलिस निरीक्षकांना असणे आवश्यक आहे. माहिती असण्यासह प्रत्येकाचा रेकॉर्ड ठेवणेही आवश्यक आहे. ‘चलता है, देख लेंगे’, असे आता खपवून घेतले जाणार नाही, असा गर्भित इशारा पोलिस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत दिला. सिव्हिल लाइन्समधील पोलिस जीमखाना येथे मंगळवारी गुन्हे आढावा बैठक झाली. त्या रस्तोगी यांनी पोलिस निरीक्षकांना सदर ‘ताकीद’ दिली.

नागरिक मोठ्या आशेने पोलिस स्टेशनमध्ये येतात. प्रत्येक नागरिकांचे समाधान व्हायलाच पाहिजे. पोलिसांना काळानुसार बदलायला हवे. हा बदल नागरिकांना दिसला हवा. नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्या. प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घ्या. पोलिसांनी वेळीच अदखलपात्र गुन्हाच्या तक्रारीची दखल घेणे आवश्यक आहे. असे झाल्यास होणाऱ्या घटनांवर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल. तक्रार आली तर बीटमधील कर्मचाऱ्याला ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे.त्याच्याकडे पाठवा म्हणजे होणाऱ्या घटना टळतील. गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शहरातील गुन्हेगारी घटनांचा आढावा सादर केला.

@९.१५ वाजता पोलिस स्टेशन

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आता ‘@ होम’ हे सांगणे खपवून घेतले जाणार नाही. या कालावधीत पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशनच्या जवळपास असणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा पोलिस आयुक्त, पोलिससह आयुक्त पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक भेट देतील. यावेळी पोलिस स्टेशनचा संपूर्ण ‘रेकॉर्ड’ व्यवस्थित असायला हवा. सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त,अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त व पोलिस आयुक्तांची त्यावर तपासणीची स्वाक्षरी असायला हवी. हा रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कमीत कमी ताकिद व जास्तीत जास्त बडतर्फ करण्याची शिक्षा होईल,अशीही माहिती आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *