facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / नानाला आवडलं राज ठाकरेंचं काम

नानाला आवडलं राज ठाकरेंचं काम

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – ‘राज जे काही करतो, ते पराकोटीचं चांगलं असतं. खूप छान काम करतो,’ अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

नाशिकमधील पांडवलेणीच्या पायथ्याशी मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या वतीनं बोटॅनिकल गार्डन साकारण्यात आलं आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा काल राज यांच्या हस्ते झाला. नाना पाटेकर हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना मांडताना नानांनी राज यांच्या अभिनव कल्पनांचं व कामाचं कौतुक केलं. ‘माणूस म्हणून मी राज यांचा खूप आभारी आहे. नाशिकमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलंय. राज यांचा पक्ष आणखी काही शहरात निवडून आला तर बरं होईल. तिथंही अशीच छान काम होतील,’ असंही नानांनी सांगितलं. अभिनेते भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदेही यावेळी उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *