facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / निळवंडे योजनेच्या पाइपलाइनला गळती

निळवंडे योजनेच्या पाइपलाइनला गळती

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या निळवंडे धरणातून आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरासाठी पाणीयोजना राबविली आहे. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास या पाणीयोजनेच्या पाइपलाइनवर दाब आल्याने कळस खुर्द शिवारात या पाइपलाइनला गळती लागली. पाण्याचा प्रवाह जबरदस्त असल्याने एका शेतकऱ्याची जमीन प्रवरानदीत वाहून आली. सहा ते सात तास पाण्याची गळती सुरूच होती. लाखो लीटर पाणी वाया गेल्याने अकोले तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी गुरत्वाकर्षणबलाचा वापर करून आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून बंदिस्त पाणीयोजना साकारली आहे. एक वर्षापूर्वी ही योजना खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि संगमनेरकरांची तृष्णा भागवू लागली. कोल्हार घोटी राज्य मार्गावर कळस खुर्द शिवारत नवीन पुलाजवळ मंगळवारी पहाटे या बंदिस्त पाइपलाइनमधून मोठ्या प्रामाणावर पाण्याचे कारंजे बाहेर उडू लागले. निळवंडे धरणातून पाणी सुरूच असल्याने पाण्याला मोठा वेग होता. सकाळच्या सुमारास ही घटना प्रवाशांसह परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. या वेळी काही नागरिकांनी जलसंपदा विभगाशी संपर्क साधला तर कहींनी निळवंडे धरणाच्या अभियंत्यांशी संपर्क साधून पाणी बंद करण्याच्या सूचना केल्या. परंतु, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पाणी वाया गेले. याशिवाय ताराबाई पंढरीनाथ वाघमारे यांच्या मालकीचे शेत पाण्यामुळे नदीत वाहून चालले होते. पाणी बंद करण्याचा अधिकार संगमनेर नागरपरिषदेला असल्याची माहिती समजल्यानंतर समता परिषदेचे कार्याध्यक्ष तानाजी झोडगे यांनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्याशी संपर्क साधून पाणी बंद करण्याची विनंती केली. यानंतर काही वेळातच संगमनेर नागरपरिषदेचे काही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ निळवंडे धरणावरील अभियंत्यास पाइपलाइनचा चोक बंद करण्यास सांगितले. यानंतर शेजारी असलेल्या एका व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाणी काढून दिले. त्यामुळे काही वेळातच पाण्याचा वेग कमी झाला. दुपारपर्यंत पाणी कमी झाले होते; मात्र, मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले होते. पाइपलाइन वेल्डिंग केलेल्या ठिकाणी लिकेज झाल्याने पाणी वाया गेले, अशी चर्चा सुरू होती.

चौकट –

आपले पाणी हक्क परक्यांचा

निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी गेलेल्या पाण्यावर केवळ संगमनेरचाच हक्क आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जलसंपदा व धरणाचे अधिकारी संगमनेर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचेच ऐकतात. आपले पाणी असूनही त्यावर परक्यांचा जास्त अधिकार चालतो हे अकोले तालुक्यातील नागरिकांना अनुभवयास मिळाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *