facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / प्रेम अन् अश्रूंचा हृद्द सोहळा

प्रेम अन् अश्रूंचा हृद्द सोहळा

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – आयुष्यभर रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर ज्यावेळी स्वतः रुग्णशय्येवर होते त्यावेळी याच हजारो हातांनी त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी देवापुढे हात पसरले होते. डॉक्टरांच्या डोळ्यातल प्रकाश जरी नियतीने हिरावून घेतला असला तरी हेच हजारो डोळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश घेऊन आले. अशा हजारोंचे डॉक्टर डांगरे यांनी ज्यावेळी आभार मानले तेव्हा सभागृहात मोठ्या संख्येने जमलेल्यांचे डोळे पाणावले.

प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना मंगळवारी मैत्री परिवाराच्यावतीने ‘मैत्री गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. डांगरे यांचा परिचय करून देताना मैत्री परिवाराचे प्रा. संजय भेंडे यांना अश्रू अनावर झाले. खाली बसल्यानंतरही ते बराच वेळ स्वतःला सावरू शकले नाही. तशीच अवस्था सभागृहात अनेकांची झाली होती. त्यानंतर डॉ. विलास डांगरे यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले,‘समाजबांधवांची, राष्ट्राची सेवा करणे हाच माझा धर्म आहे. त्यासाठी सत्कार व्हावा अशी कधीच अपेक्षा नव्हती. जे केले ते लोकांच्या प्रेमापोटी केले. मिळालेल्या जीवनात जे काही हातून चांगले काम घडले त्यामुळे जीवन सार्थकी लागल्याचे आज समाधान वाटते आहे.’ डॉ. डांगरे यांनी त्यांच्या आजारपणात लोकांनी दिलेल्या भरपूर प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘माझ्या आजारापणात हजारो बांधवांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केले. माझ्या आरोग्यासाठी देवासमोर हात जोडले, पूजा बांधली. या असंख्य लोकांच्या प्रेमापोटीचे यमाने मला परत पाठवले. मला दिसत नाही हे जेव्हा कळाले तेव्हा आपल्या कामाला आता पूर्णविराम मिळणार याचे अधिक दुःख झाले होते. ज्या रुग्णांना माझा आधार वाटत होता त्यांनीच या काळात आधार दिला. त्यांच्या प्रेरणा, संवेदनांनी मला जगवले. चांगले काम करण्याची उर्मी दिली’, असे डॉ. डांगरे सांगत होते आणि सभागृहातले शेकडो डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सोबतच, सामाजिक क्षेत्रातील रामभाऊ पुजारी, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. संदीप खानझोडे, शिक्षण क्षेत्रासाठी वरुण श्रीवास्तव, क्रीडा क्षेत्रासाठी अब्दुल जब्बार, पर्यावरण क्षेत्रासाठी विजय लिमये यांना गौरविण्यात येणार असून राष्ट्रीय बाल पुरस्कारप्राप्त मनोज्ञा वैद्य हिचाही सत्कार करण्यात आला. सोनाली नक्षिणे यांनी प्रत्येक सत्कारमूर्तीचा तयार केलेला माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. दिनदर्शिकेचे तसेच, मैत्री गीताच्या सीडीचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक संजय भेंडे यांनी, सूत्रसंचालन माधुरी यावलकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विजय शाहाकार यांनी केले.

–असेही मैत्रीपूर्ण दान

मैत्री परिवारातर्फे डॉ. विलास डांगरे यांना पुरस्कार स्वरुपात २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. डॉ. विलास डांगरे यांनी त्यात १ लाख रुपयांची भर घालत १ लाख २१ हजार रुपयांचा निधी परत मैत्री परिवाराच्या सुपूर्द केला. त्यांचे हे मैत्रीपूर्ण दान बघून प्रत्येकांनी मनातल्या मनात डॉक्टरांना वंदन केले.

–सज्जनशक्ती समोर यावी : मोहन भागवत
समाजात जितके वाईट लोक आहेत त्यापेक्षा वीस टक्के अधिक चांगले लोक आहे. या चांगल्या लोकांच्या पुण्याईवरच समाज, देश चालत असतो. डॉ. डांगरे आणि इतर सर्व सत्कारमूर्तीसारख्‍्या सज्जनशक्तीला समाजासमोर आणण्याची गरज आहे. हे काम मैत्री परिवार करीत आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *